कोल्हापूर : अयोध्या येथे प्रभू रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी पहिली एक्सप्रेस मंगळवारी रात्री निघाली असताना त्याचे सारथ्य करण्याचा मान इचलकरंजीचे सुपुत्र लोको पायलट गणेश सोनवणे यांना मिळाला.
अयोध्या येथे प्रभू बालक रामांचे भव्य मंदिर साकारले आहे. दर्शनासाठी दररोज गर्दी वाढत चालली आहे. अशातच भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येला जाण्यासाठी सवलतीचा दर दिला आहे. आज रात्री पहिली रेल्वे अयोध्येला रवाना झाली. याचे सारथ्य करण्याचा मान इचलकरंजीचे गणेश सोनवणे यांना मिळाला असून अमित पाटील हे सह लोको पायलट आहेत.
हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात गणेश जयंती उत्साहात
हेही वाचा – कोल्हापूर : परराज्यातील सराईत चोरट्याकडून घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
महापालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले गणेश हे संयमी, लोभस, संयमी, जिद्दी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. मिरज रेल्वे मध्ये २२ वर्षे सेवा करताना त्यांनी सह लोको पायलट म्हणून सुरुवात केली. मालगाडी, पॅसेंजर व एक्सप्रेस अशी सेवा करताना आता ते लोको पायलट आहेत. रेल्वे सेवा कार्याबद्दल त्यांना चार-पाच वेळा सन्मानित करण्यात आले आहे. अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या रेल्वेचे सारथ्य करताना कोल्हापुरी जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून आनंद होत आहे, अशी भावना गणेश सोनवणे यांनी व्यक्त केली.