तरुणाईचा वैविध्यपूर्ण कलाविष्कार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर : कलाभान जागवणाऱ्या तरुणाईच्या उत्साही वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरीची नांदी सोमवारी कलानगरी कोल्हापुरात झाली. विषयातील वैविध्य आणि आविष्कारातील नावीन्य हे सलामीच्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. विवेकानंद महाविद्यालयाच्या कलामंचावर सोमवारी उत्तमोत्तम एकांकिका सादर करण्याचा सुरेख प्रयत्न सर्वच संघांनी केला.
कलेचे माहेरघर म्हणून कोल्हापूर ओळखले जाते. चित्रपट, चित्रकला याच्या बरोबरीनेच कोल्हापूरची नाटय़परंपरा उल्लेखनीय आहे. या शहराचे नाटय़प्रेम लक्षात घेऊनच ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा येथे गतवर्षांपासून भरवल्या जात आहेत. आज या स्पर्धेचा पडदा उघडला तो ‘तुझ्या शब्दात सांगायचं तर’ या एकांकिकेने.
तत्पूर्वी, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होणगेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी आयरिश प्रॉडक्शनचे हेड विद्याधर पाठारे, अभय परळकर , विवेक रानवडे उपस्थित होते.
पाठारे या वेळी म्हणाले, की ग्रामीण भाग असूनही येथील नव्या दमाचे कलाकार, दिग्दर्शक उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. पहिल्या दिवशी काही उत्तम कलाकृती पाहायला मिळाल्या. कलाकारांमधील ऊ र्जा पुढेही टिकून राहावी.
स्पर्धेत उतरण्याची तयारी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात मंचावर उतरण्यापूर्वी सुरू असलेली लगबग, उत्साह, काहीशी धाकधुक, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईष्र्या आणि खिलाडूपणा अशा वातावरणात स्पर्धेला सुरुवात झाली. तरुणाईचे भावविश्व आणि सामाजिक विषयांवर आधारित संहिता हे सलामीच्या दिवशीचे वैशिष्टय़ ठरले.
देवी पार्वती महाविद्यालयाने ‘तुझ्या शब्दात सांगायचं तर’ या एकांकिकेमध्ये महिलांवरील अत्याचाराची मांडणी केली होती. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समाज माध्यमाच्या आहारी गेलेल्या तरुणाईवर प्रकाश टाकला. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आर. आर. पाटील महाविद्यालयाने जन्म, मृत्यू आणि मानवाचे अस्तिव याचा वेध घेतला .
प्रायोजक
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे टॅलेन्ट हंड पार्टनर आयरिश प्रोडक्शन असून एरेना मल्टीमीडिया हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. अस्तित्वच्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.