कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत निरंजन टकले यांना देण्यात येणार आहे यांना २८ मे रोजी देण्यात येणार आहे, अशी माहिती भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष वकील अशोकराव साळुंखे, कार्याध्यक्ष डॉक्टर टी. एस. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. भाई माधवराव बागल हे राज्यातील क्रांतिकारक समाजसधारक, थोर परिवर्तनवादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जयंतीदिनी माधवराव बागल विद्यापीठाकडून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास ५ हजार रुपये, शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृतीचिन्ह या स्वरूपातील पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते व इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे.
माधवराव बागल पुरस्कार निरंजन टकले यांना जाहीर
भाई माधवराव बागल हे राज्यातील क्रांतिकारक समाजसधारक, थोर परिवर्तनवादी नेते म्हणून ओळखले जातात
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-05-2024 at 23:04 IST | © The Indian Express (P) Ltd
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhavrao bagal award announced to senior journalist niranjan takle zws