कोल्हापूर : आधीपासून उमेदवारीवरून गाजत असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर उमेदवारी नाकारलेले राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने गोंधळात भर पडली आहे.
हेही वाचा – कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू
हेही वाचा – सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
या मतदरसंघात काँग्रेस अंतर्गत मोठी चुरस निर्माण झाली होती. आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याला विरोध झाल्यावर २४ तास उलटण्याच्या आत मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटांत खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी उमेदवारी मागे घेतली. राजेश लाटकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी मधुरिमाराजे छत्रपती यांचा अर्ज मागे घेत असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी सकाळपासून लाटकर यांचा फोन बंद आहे.