महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी १जुलपर्यंत जनतेने लेखी सूचना सादर कराव्यात. त्यानंतर या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय शुक्रवारी येथे घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महालक्ष्मी विकास आराखड्यांतर्गत येथील केशवराव भोसले नाट्यगृहात बठकीचे आयोजन केले होते. तेव्हा ही भूमिका मंत्री पाटील यांनी स्पष्ट केली.

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरकरांसाठी श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पर्यटन समितीच्या बठकीत लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्याबरोबरच नागरिकांच्या सूचनांचाही विचार व्हावा, अशी सूचना पुढे आली. त्यानुसार आज ही बठक घेण्यात आली. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला पूरक सूचना आज व्यक्त झाल्या. या माध्यमातून प्रशासनाचा आराखडा जनतेपुढे यावा, हा एक दृष्टिकोन आहे. आराखड्याविषयी लेखी सूचना देण्यासाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला. येत्या १ जुलपर्यंत जनतेने त्यांच्या सूचना मांडाव्यात. त्यानंतर हा आराखडा माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येईल. ते या बाबत सकारात्मक असून, प्रामुख्याने दर्शन मंडपाचा मार्ग पहिल्या टप्प्यात तडीस नेण्याचा आमचा मानस आहे, असे मंत्री पाटील यांनी  स्पष्ट केले. महाल्क्ष्मी मंदिर विकास आराखडा एकूण २५५ कोटी रुपयांचा आहे. पहिल्या टप्प्यात ७२ कोटी रुपयांचा निधी असून त्यामध्ये तीन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिराचा विकास करताना देखभाल कृती आराखड्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक यांनी आराखडा तयार करताना पुढील २५ वर्षांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.  आमदार सतेज पाटील म्हणाले,की हा आराखडा पुढील १०० ते २०० वष्रे टिकणार आहे. त्यामुळे दर्शनरांग, सीसीटीव्ही, बसेसची व्यवस्था आणि महत्त्वाचे म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी सरकते जिने आदि बाबींचा सखोल विचार व्हावा.