हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कैद्यांकडून लाडू बनवून घेण्याचा प्रयोग
करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीच्या भक्तांना लाडू प्रसाद वाटपास मंगळवारपासून सुरुवात झाली. भक्तांना नियमितपणे लाडू प्रसाद देण्यात येणार असून, कळंबा कारागृहातील कैद्यांकडून हे लाडू बनवून घेतले आहेत. त्यासाठी कारागृहात विशेष कक्ष बनवण्यात आला आहे. आठ रुपयांना लाडू मिळणार असून, पहिल्या दिवशी ३ हजार लाडू विक्रीसाठी आणले होते.
महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना प्रसाद रूपाने काय द्यायचे यावरून गेले काही महिने वाद होता. जिल्हाधिकाऱ्यांनी भक्तांना लाडू प्रसाद देण्याचा विचार व्यक्त केला होता.त्यास बजरंग दलाने पारंपरिक खडी- साखर, फुटाणे देण्याची मागणी करताना कैद्याकडून लाडू प्रसाद भक्तांना देण्यास विरोध दर्शवला होता. अखेरीस जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष अमित सनी यांनी लाडू प्रसाद देण्याचे निश्चित केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती त्याची कार्यवाही करणार आहे. पूर्वीच्या तुलनेत लाडू दरात ३ रुपये वाढ करण्यात आली आहे.
कळंबा कारागृहातील कैदी लाडू प्रसाद बनवणार आहेत. कैद्याकडून लाडू बनवून ते भक्तांना देण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. त्यांना त्याचा मोबदलाही मिळणार आहे. यासाठी कारागृहात विशेष कक्ष बनवण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या भागात कळ्या पाडण्याचे काम चालणार आहे, तर दुसऱ्या खोलीमध्ये लाडू बांधणे व ते पिशवीत भरण्याचे काम चालणार आहे. या कामाची पाहणी मंगळवारी कारागृह उपअधीक्षिका स्वाती साठे यांनी केली. त्यांच्या उपस्थितीत बंद पिशवीतील लाडू वाहनातून महालक्ष्मी मंदिरात आणण्यात आले. लाडू प्रसाद वाटपाच्या पहिल्या दिवशी भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी भाविकांना लाडू प्रसाद नियमितपणे मिळत नव्हता. र्निजतुक व व्यवस्थित असा लाडू प्रसाद मिळत नसल्याच्या तक्रारी भाविकांकडून वारंवार होत राहिल्या. त्याची दखल घेऊन प्रसाद योग्य जागी, योग्य प्रकारे व शुचितेची नीट काळजी घेऊन बनवण्यावर भर देण्यात आला आहे. कारागृह प्रशासन आता देवस्थान समितीकडे मागणीप्रमाणे लाडू प्रसाद पॅकिंगसह पुरविणार आहे.