दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाने कोल्हापूर-सांगली भागांमध्ये महापुराचा धोका उद्भभवणार असल्यानेच हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्याचा इरादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Docandrakant Nimbarte of Congress supports the candidate of the Grand Alliance
काँग्रेसचे डॉ.चंद्रकांत निंबार्ते यांचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
Congress neglecting Dalit candidate Praveen Padvekar may impact all six seats in chandrapur district
चंद्रपुरात कॉंग्रेस उमेदवाराची स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून कोंडी? जिल्ह्यातील इतर जागांवर परिणाम होण्याची शक्यता
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी

कृष्णा नदीवरील विजापूर जिल्ह्यातील ११० टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या अलमट्टी धरणाचा मुद्दा गेली २० वर्षे सतत चर्चेला येत असतो. महाराष्ट्राच्या सीमेपासून २३५ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. या धरणाची उंची वाढवण्याचा इरादा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केल्यावर गतवर्षी राज्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘या निर्णयाचा अभ्यास करण्याची सूचना जलसंपदा विभागाला दिली आहे. निष्कर्ष निघाल्यानंतर आवश्यकतेनुसार कर्नाटक सरकारशी चर्चा करू, असे ट्वीट केले होते.

या धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला अतोनात फटका बसत असल्याचा मतप्रवाह आहे. अलमट्टी धरण हे महापुराचे कारण होत नाही, असाही सूर आहे. एकंदरीत तज्ज्ञांमध्येही अलमट्टीच्या धरणावरून मतभेद दिसून येतात. अलमट्टीचा फुगवटा (बॅकवॉटर) आणि कोयना धरणातील विसर्ग या दोन्हीची सांगड महापुराशी घातली जाते. २००५ सालच्या महापुरानंतर मेधा पाटकर यांच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणात अलमट्टी धरण महापुराला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी ही भूमिका वारंवार मांडली आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती उद्भवते हा मुद्दा सिद्ध झालेला नाही. कृष्णा तंटा लवादासमोर याची स्पष्टता झालेली नाही. अलमट्टी आणि महापूर याचा संबंध शासकीय यंत्रणेकडून तपासून पाहण्याची गरज पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा एक वर्ग व्यक्त करताना दिसतो. मुळात, धरणाची माहिती झाकून ठेवली जात नाही. कृष्णा लवादानुसार आणि उपलब्ध पाण्याप्रमाणे धरणे बांधली जातात. कृष्णा जल मंडळाच्या आंतरजालावर सर्व माहिती मिळत असताना नाहक शंका उपस्थित करणे रास्त नाही, असे अभ्यासकांचे मत आहे.

२००५ आणि २०१९ सालच्या महापुरानंतर नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. वडनेरे यांनी एका मुलाखतीमध्ये अलमट्टीतील पाणीसाठा आणि त्यातील अनियंत्रित विसर्ग हे महत्त्वाचे कारण असल्याचे उद्धृत केले होते. अहवालात मात्र त्यांनी अलमट्टी धरणाशी संबंध जोडलेला नाही. यामुळेही संभ्रमात भर पडली आहे. दुसरीकडे कृष्णा महापूर नियंत्रण समितीने, समितीतील निवृत्त पाटबंधारे अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरण हे कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांच्या महापुराचे प्रमुख कारण असल्याचे वारंवार शासनास कळवले आहे.

कोकणाला फटका?

अलमट्टी धरण आणि कोकण यांचा परस्परसंबंध काय? असा कोणाला प्रश्न पडत असेल तर त्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेली मांडणी विचारात घ्यावी लागेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या भेटीप्रसंगी शेट्टी यांनी अलमट्टीची उंची वाढली तर दक्षिण महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात महापुराचा दणका बसणार असल्याने धरणाची उंची वाढू न देता कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी या नदीवरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याचा पर्याय समोर ठेवला होता.

अलमट्टीची उंची वाढल्यास त्याचा कोल्हापूर, सांगलीपेक्षा चिपळूणला जास्त धोका आहे. कोयना धरणातील पाण्याची क्षमता संपेल आणि चिपळूणमध्ये पाणी सोडले जाईल. त्यामुळे शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक जलवाटप कराराबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.