लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कास्य पदकापासून सुवर्णपदकापर्यत पोहोचणाऱ्या मल्लांची डोपींग चाचणी करण्याचा महत्वाचा निर्णय रविवारी येथे वस्ताद पैलवान गोलमेज परिषदेत घेण्यात आला. कोनवडे ( ता. भुदरगड ) येथे खासबाग केसरी कुस्ती मैदान समितीने राजर्षी शाहू प्रबोधनी येथे वस्ताद पैलवान गोलमेज परिषदेचे दोन सत्राचे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यभरातून नामांकित, अभ्यासू वस्ताद पैलवान, निवेदक, कुस्ती शौकिन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी हिंदकेसरी दीनानाथ सिंह होते.

Shrigonda Vidhan Sabha Constituency, Pratibha Pachpute,
मुलासाठी आईची माघार.. भाजपचा एबी फॉर्म आईने दिला मुलाला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
बहुजन विकास आघाडीला अखेर शिट्टी चिन्ह मिळाले, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
India Senior Players Refuse to Play Duleep Trophy Before Home Test Series Rohit Sharma Virat Kohli IND vs NZ
भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनी BCCI च्या निर्णयानंतरही दुलीप ट्रॉफी खेळण्यास दिलेला नकार, किवींविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर मोठा खुलासा?
Indian team focus on net practice for Border Gavaskar Trophy sport news
बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी भारताचा नेट सरावावर भर
PCB Chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025 Said Will Try to make the Visa Issuance Policy Brisk For Indian Fans
Champions Trophy: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यासाठी PCBची अनोखी योजना, भारतीय चाहत्यांसाठी आखली नवी कल्पना

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा तसेच पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा असा ठराव करण्यात आला. स्वागत पैलवान संग्राम कांबळे यांनी केले. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले, या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीसाठी डोपींग चाचणीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; एकजण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

दीपाली सय्यद म्हणाल्या, महाराष्ट्रातील कुस्ती संघटनने एकत्र येणे गरजेचे आहे. महायुतीने कुस्तीला उर्जितावस्था देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री सहाय्य निधीतुन शस्त्रक्रिया योजनेचा १२५ पैलवानांनी लाभ घेतला आहे, असे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.

पैसा महत्वाचा

मल्लसम्राट अस्लम काझी म्हणाले, कुस्तीत विजेत्यास ७० आणि हरलेल्या मल्लास ३० टक्के बक्षिसाची रक्कम विभागून दिली पाहिजे. महाराष्ट्र केसरी विष्णु जोशिलकर यांनी कुस्तीत ईर्षा कमी होऊन पैसा महत्वाचा झाला असल्याची खंत व्यक्त केली.

नुराला आस्मान

खासबाग मैदानातील पवित्र लाल माती हातात घेऊन विजेता आधीच निश्चित करणाऱ्या ‘ नुरा कुस्ती’ विरोधात एल्गार पुकारण्यात आला. कुस्ती हि निर्भेळ ‘ काटाजोड’ पद्धतीने झाली पाहिजे, असा ठराव करण्यात आला. कार्यक्रमास खाशाबा जाधवांचे सुपुत्र रणजीत जाधव , मेघराज कटके , सोनबा गोंगाणे , संग्राम पाटील , बट्टु जाधव , राजर्षी शाहु प्रबोधनी संस्थापक राजेंद्र गुरव , संतोष वेताळ , आनंदा धुमाळ यांच्यासह महाराष्ट्रातील वस्ताद आणि पैलवान उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात न गुंतता विधानसभेच्या तयारीला लागावे, धनंजय महाडिक यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

संमत ठराव याप्रमाणे

  • संघटनेतर्फे किंवा वेगवेगळ्या तालीम संघातर्फे देण्यात येणाऱ्या मैदान आयोजकांना परवानगी मध्ये काही नियम घालून द्यावेत.
  • डोपिंग विरोधी मैदान घ्यावे.
  • मैदान वेळी एक ॲम्बुलन्स व डॉक्टर मैदानात उपस्थित असावेत.
  • महाराष्ट्रातील पैलवानाच्या कुस्त्या घेण्यावर भर असावा.
  • महाराष्ट केसरी कुस्ती स्पर्धा एका छताखाली घ्यावी.
  • महाराष्ट्र केसरी किंवा हिंदकेसरी , रुस्तुम ए हिंद केसरी या नावाचा दुरुपयोग अन्य खेळांमध्ये करू नये.
  • बंद पडलेल्या तालमीत चालू करून त्यांना शासनातर्फे आत्याधुनिक दर्जाची मॅट व जिम साहित्य दयावे.
  • कुस्तीतील दलाली बंद झाली पाहिजे.