कोल्हापूर : केंद्र सरकार मांडत असलेले धोरण, केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचा प्रभाव राज्याच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्याोगातील तरतुदींमध्ये आहे. टेक्निकल टेक्स्टाईल (तांत्रिक वस्त्रोद्याोग) या घटक वृद्धीसाठी वित्त तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन’ची स्थापना करण्याची घोषणा केली. वस्त्रोद्याोगाला ७७४ कोटींची तरतूद पुरेशी असली तरी ती विकेंद्रित क्षेत्रात पसरलेल्या वस्त्र उद्याोजकांपर्यंत कितपत पोहोचणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्राने ‘टेक्निकल टेक्स्टाईल’ वाढीसाठी अधिक लक्ष पुरवले आहे. वस्त्रोद्याोगविषयीच्या जागतिक प्रदर्शनात पंतप्रधान मोदी यांनी टेक्निकल टेक्स्टाईल देशभर गतीने वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. याचाच प्रभाव या वेळच्या राज्याच्या अर्थसंकल्पात पडल्याचे चित्र आहे. राज्याच्या वस्त्रोद्याोग धोरणात ‘टेक्निकल टेक्स्टाईल’ला गती देण्याची भूमिका मांडली गेली. पण याबाबतीत गेल्या दोन वर्षांत भरीव काही घडले नव्हते. आता वित्तमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन’च्या स्थापनेची घोषणा करून नवे आकाश उघडले आहे.

‘महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन’मुळे टेक्निकल टेक्स्टाईलमधील संशोधन, उत्पादन, वापर वाढीस लागण्यासाठी मदत होईल. या क्षेत्राकडे वस्त्र उद्याोजक, नवउद्यामी अधिक संख्येने ओढले जातील.

  • चंद्रकांत पाटील,अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन

टेक्निकलबाबत शासनाला बरेच काही करायचे असले तरी अजूनही या क्षेत्राला वस्त्र उद्याोजकांच्या अपेक्षेनुसार गती मिळत नाही. यामध्ये विकेंद्रित क्षेत्रातील उद्याोजकांना पुढे जाण्यासाठी अडचणी उद्भवत असतात. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मार्ग सुकर केला पाहिजे.

  • तुषार सुलतानपुरे, ‘टेक्निकल टेक्स्टाईल’ उद्याोजक

सहकारी सूतगिरण्यांना भागभांडवल, यंत्रमागधारक व्याज सवलत, भांडवली अनुदान, वस्त्रोद्याोग संकुल उभारण्यासाठी अनुदान, अल्पसंख्याक समाजाचा साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढवणे अशा बाबींचा समावेश समाधारकारक आहे. तथापि, साखर उद्याोगाप्रमाणे वस्त्रोद्याोगाला अधिक निधी मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

  • अशोक स्वामी, अध्यक्ष, राज्य वस्त्रोद्योग महासंघ

Story img Loader