कोल्हापूर : आज कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याची भविष्यातील निकड लक्षात घेत वीज क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यानी त्याच्याशी जुळवून कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल, असे मत महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या ४७ व्या राज्यव्यापी अधिवेशनाला येथे आजपासून सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भारत पाटील, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश लडकत, संजय खाडे, विजय गुळदगड, अप्पासाहेब पाटील, श्रीकांत सणगर उपस्थित होते.

दिनेश लडकत यांनी वीज क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी असून वीज ग्राहकांनाही जागरूक करावे लागेल. वीज क्षेत्राच्या अस्तित्वासाठी सर्वांनाच भूमिका घेऊन लढा द्यावा लागणार असल्याचे सांगितले. अधिवेशनास महापारेषणचे महाव्यवस्थापक मंगेश शिंदे, कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने व अभिजित सिकनिस, अधिकारी उपस्थित आहेत.