कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला धवल यश मिळाले आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. सर्व दहा जागांवर भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

कोल्हापूर उत्तर मध्ये शिंदे सेनेचे राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांचा पराभव केला. तर दक्षिण मतदार संघात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना माजी आमदार अमल महाडिक यांनी पराभूत केले.

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Budget 2025 Bihar National Institute of Food Technology
निवडणूक वर्षात बिहारवर पुन्हा खैरात
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?

जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विजयाचा षटकार मारताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजीत घाटगे यांना दुसऱ्यांदा पराभूत केले. चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांनी आमदार राजेश पाटील यांच्या पराभवाची परतफेड केली.

हेही वाचा >>> कोल्हापुरात निकालापूर्वीच अनेकांना मंत्रिपदाचे वेध, उमेदवारांकडून दावे-प्रतिदावे सुरू

करवीर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसचे राहुल पाटील यांना पराभूत केले. राधानगरी भुदरगड मतदार संघात तिसऱ्यांदा आमदार कोणी होत नाही हा प्रवाद खोडून काढत प्रकाश आबिटकर यांनी हॅट्रिक साधताना ठाकरे सेनेचे माजी आमदार के. पी. पाटील यांना तिसऱ्यांदा पराभूत केले.

हेही वाचा >>> Saroj Patil: “पवार थकले म्हणून डिवचता…”, लाडक्या भावासाठी बहीण सरोज पाटील यांची जबरदस्त कविता

जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळाले ते राहुल आवाडे यांन. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यानंतर आवाडे घराण्यातील राहुल आवाडे हे तिसरे आमदार झाले आहेत. त्यांनी दणदणीत विजय मिळवताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्यावर मात केली.

शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवताना काँग्रेसचे गणपतराव पाटील यांना पराभूत केले. पन्हाळा वारणा शाहूवाडी मतदार संघात जन स्वराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी आणखी एक विजय मिळवताना पारंपारिक प्रतिस्पर्धी सत्यजित पाटील सरूडकर या ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. सरुडकर हे लोकसभेलाही पराभूत झाले होते. जनसुराज्य पक्षाने शेजारच्यात हातकणंगले राखीव या मतदारसंघात विजय मिळवला. येथे गत वेळी पराभूत झालेली अशोकराव माने हे विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांना पराभूत केले.

Story img Loader