कोल्हापूर : ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हातकणंगले लोकसभा जिल्हा उपप्रमुखपदी इचलकरंजीचे महेश बोहरा यांची बुधवारी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर महादेव गौड होते. त्यांना पदमुक्त करण्यात आले असल्याचे ठाकरे सेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय हालचाली आज वाढल्या आहेत. इचलकरंजीचे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान ठाकरे सेनेमध्ये यावरून हालचाली वाढीस लागल्या आहेत. ठाकरे सेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज काही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले. त्यानुसार त्यांनी हातकणंगले लोकसभा उपजिल्हाप्रमुखपदी महेश बोहरा यांची निवड केली आहे.

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”

हेही वाचा – ठाकरे सेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांचा पक्षाला रामराम; शिंदे सेनेत प्रवेश करणार

शहर प्रमुख ते उपजिल्हा प्रमुख

महेश बोहरा यांनी यापूर्वी इचलकरंजी शहर विधानसभेचे अध्यक्षपद म्हणून काम पाहिले आहे. ते २००९ ते २०११ या दोन वर्षांमध्ये इचलकरंजी शहराचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी सातत्याने आंदोलन करून शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवला होता. त्यानंतर ते इचलकरंजी नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य होते. त्यांनी सामान्य कुटुंबातील मुलांचा शाळा प्रवेशासाठी मोठी जबाबदारी पार पाडली होती. तर आता त्यांना उपजिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर बेछूट आरोप; रमेश चेनिथला

गौड विरोधात नाराजी

दरम्यान अरुण दुधवडकर यांनी महादेव गौड यांना उपजिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त केले आहे. महादेव गौड यांनी ठाकरे सेनेला सोडण्यावरून पक्षांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी ठाकरे सेना सोडली तेव्हा महादेव गौड यांनी गद्दार खासदार, आमदार यांच्या विरोधात आंदोलन केले होते. खरी शिवसेना ही ठाकरेंची आहे, असे ते सातत्याने सांगत होते. आता मात्र ते वेगळ्याच लोभाने, आमिषाने शिंदे सेनेमध्ये गेले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. प्रकृती ठीक नसते असेही कारण यापूर्वी त्यांनी पक्षाला दिले होते. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून अधिक महत्त्वाची जबाबदारी दिली नव्हती, असेही ठाकरे सेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे आता शिवसेनेतील आरोप – प्रत्यारोप आणखी वाढीस लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.