कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या येथील सदर बाजार परिसरातील संशयित आरोपी भूकंप ऊर्फ  बंडय़ा आनंदा दाभाडे याला सोमवारी शाहूपुरी पोलिसांनी पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता २१ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून दाभाडे याने शनिवारी तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. दाभाडे याला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी सदर बाजार परिसरातील नागरिकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर रविवारी मोर्चा काढला होता. दाभाडे याला ताब्यात घेण्यासाठी रवाना करण्यात आलेल्या पोलीस पथकाने त्याला सातवे येथे ताब्यात घेतले.  गैरकृत्यामुळे नागरिक मारतील या भीतीने तो पन्हाळा परिसरात लपून बसलो होतो असे त्याने पोलिसांना सांगितले.