कोल्हापूर : कोल्हापुरात काल रात्री इराणहून आलेल्या तरुणास करोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने चिंता वाढली असताना आज निजामुद्दिनला गेलेला तरुण तसेच  बावडय़ातील महिला करोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला. करोनामुक्त झालेल्या शाहूवाडी तालुक्यातील तरुणाला रविवारी टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षांवात डिस्चार्ज देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील तरुणाला ९ एप्रिल रोजी करोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाल्याने उपचार सुरु होते. १४ दिवसांनंतर या तरुणाचे दोन्ही अहवाल नकारात्मक आल्याने तो करोनामुक्त झाला होता. आज करोना या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षांवात या तरुणाला निरोप दिला.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी या तरुणाच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी या तरूणाला औषधे दिली.  यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

डॉ. मीनाक्षी गजभिये म्हणाल्या, जिल्ह्यातील पहिल्या दोन करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज एका तरुणाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर शहराचे उपनगर असलेल्या कसबा बावडा येथील महिलाही करोनामुक्त झाली आहे. १४ दिवसांनंतरचे तिचे दोन्ही अहवाल नकरात्मक आले असले तरी तिला न्युमोनिया झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच तिलाही रुग्णालयातून सोडण्यात येईल.

इराणहून परतलेल्या तरुणास लागण

इराण येथे गेलेल्या तरुणाचा करोनाचा अहवाल सकारात्मक आल्याचे शनिवारी रात्री स्पष्ट झाले. तथापि, कोल्हापूर व पुणे येथील प्रयोगशाळेत त्याच्या घशाच्या स्रावाच्या फेरतपासणीनंतर त्याचा अंतिम अहवाल स्पष्ट होणार असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले. २१ फेब्रुवारी रोजी इराणला गेलेल्या तरुण १४ मार्च रोजी भारतात परतला. त्याच्यासह इतरांना राजस्थानमधील जैसलमेर येथे अलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. २८ मार्चला तपासणी केल्यानंतर या तरुणाचा अहवाल सकारात्मक नव्हता. उपचार कालावधी संपल्यानंतर म्हणजे चाळीस दिवसांनंतर ५ सहकाऱ्यांसह तो शनिवारी कोल्हापुरात दाखल झाल्यावर प्रशासनाने सर्वांना सीपीआर रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. तेथे त्यांची तपासणी केल्यावर तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.