कोल्हापूर : नजरचुकीने भरलेल्या कर्जाच्या हफ्त्याची रक्कम परत करण्याच्या मागणीवरून येथील मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बुधवारी तोडफोड करण्यात आली. याबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसात धाव घेतली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येथील दाभोळकर कॉर्नर परिसरात अयोध्या टॉवरमध्ये र मनप्पुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या फायनान्स कंपनीकडून विविध प्रकारचा व्यावसायिक कर्जपुरवठा केला जातो. प्रदीप गरड ( रा. कदमवाडी) या कर्जदाराने मोटारीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी कंपनीतील रुपेश पाटील यांनी संपर्क साधला.

तेव्हा गरड यांनी नजर चुकीने दोन मासिक हप्त्याची रक्कम भरली. गरड यांनी जादा भरलेली रक्कमपरत मिळावी अशी मागणी केली. ऑनलाईन पैसे भरलेले असल्याने ते दहा दिवसात परत दिले जातील असे त्यांना सांगण्यात आलं. यामुळे संतप्त झालेल्या गरड यांनी दोन मित्रांसमवेत क्रिकेटच्या बॅटीच्या साह्याने कार्यालयात घुसून फर्निचरची तोडफोड केली.