कोल्हापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके कोण निवडून येणार याचा काहीच थांगपत्ता नसताना अनेकांना मंत्रिपद खुणावू लागले आहे. जिल्ह्यात निकालापूर्वीच किमान अर्धा डझन उमेदवारांना मंत्री ते उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. कागलमधील दोन्ही उमेदवार मंत्रिपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. निकाल अनुकूल आला नाही, तर मंत्रिपद राहू देत, पण आमदारकीही त्यांना मग दूर असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघांत अत्यंत चुरशीच्या लढती आहेत. सर्वाधिक चुरस कागलमध्ये आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विजयाची खात्री व्यक्त करतानाच निवडून आलो, तर उपमुख्यमंत्रिपद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘कागलकरांनो, मुश्रीफ यांना पाडा. मंत्रिपदाची चिंता सोडा. त्यांच्या बदली समरजितना मंत्रिपद देण्याचा शब्द शरद पवार यांनी दिला आहे, असे म्हणत आपला उमेदवारही मंत्री होऊ शकतो,’ हे आश्वासित केले आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न

आणखी वाचा-Saroj Patil: “पवार थकले म्हणून डिवचता…”, लाडक्या भावासाठी बहीण सरोज पाटील यांची जबरदस्त कविता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधानगरीत प्रचार करताना आमदार प्रकाश आबिटकर यांची हुकलेली मंत्रिपदाची संधी ते या वेळी निवडून आले तर मिळेल, असे म्हणत मंत्रिपदाबद्दल आश्वासित केले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार के. पी. पाटील यांना वरिष्ठतेच्या श्रेणीतून मंत्रिपद मिळेल, असा विश्वास समर्थक व्यक्त करीत आहेत. याच पक्षाचे शाहूवाडी पन्हाळ्याचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर तिसऱ्यांदा निवडून येणार असल्याने त्यांच्याकडे मंत्रिपद चालून येईल, अशी खात्री त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे हे निवडून येऊन पुन्हा एकदा मंत्रिमंडळात चांगल्या स्थानी जातील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. शिरोळमधून पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाच खात्यांचे राज्य मंत्रिपद मिळाले होते. ते निवडून आल्यावर पुन्हा मंत्रिपद मिळेल, असा विश्वास सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी

दुसरीकडे, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे. जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे चार आमदार आहेत. त्यात आणखी काही भर घालून वा महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढवून सत्ता आली, तर सर्वांत मोठ्या खात्याचे मंत्रिपद मिळवण्याची त्यांची मनीषा दिसते. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव पुढे दिसते. निकालापूर्वीच समर्थकांना आपल्या उमेदवाराला मंत्रिपदाची घाई असली, तरी म्हैस पाण्यात बसली असतानाच अंदाज लावण्याचा केलेला हा निकाल धाडसी सदरात मोडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Story img Loader