पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सत्तेला दोन वष्रे उलटली, तरी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता न झाल्याने भाजपाचे अच्छे दिन कुठे आहेत. असा सवाल करीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी म्हणून मोर्चाने तहसीलदारांना आपल्या तीव्र भावनांचे निवेदन सादर केले. हे सरकार पुरते फसवे असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात जिल्हा परिषदेतील विरोध पक्षनेते जयवंत जगताप, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक बाळासाहेब यादव, प्रदीप जाधव, अविनाश नलवडे, इंद्रजित चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. तहसीलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, मोर्चेकऱ्यांपुढे बोलताना आनंदराव पाटील यांनी राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारांचा समाचार घेतला.
भूलथापा देऊन सत्ता लाटणाऱ्यांनी खुच्र्या सोडाव्यात, सत्तेवरून पायउतार व्हावे अशी टीका आनंदराव पाटील यांनी केली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा