दसरा सणासाठी अवघी बाजारपेठ सज्ज झाली आहे. दस-याच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली जाते. यामुळे आíथक उलाढाल मोठय़ा प्रमाणात होते. सोने-चांदी, टू व्हिलर, फोर व्हिलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वस्तू, प्लॅट, कपडे खरेदी अशा सर्वच प्रकारच्या बाजारपेठा सजल्या धजल्या आहेत. वस्तूंची मागणी वाढत असल्याने इतर राज्यांतून मालाची आवक करण्यात व्यापारी वर्ग व्यस्त आहे.
सोने-चांदीला आगाऊ मागणी
दस-याच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा अनेकांचा कल वाढू लागला आहे. या दिवशी विशेष करून लक्ष्मीची मूर्ती, नाणे, पूजेसाठी लागणा-या वस्तू असो किंवा एखादा दागिना तरी खरेदी केला जात आहे. यामुळे सध्या सराफ व्यावसायिकांकडे आठ दिवस आधीपासूनच दागिन्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. याशिवाय दस-याच्या मुहूर्तावर एक ग्रॅम तरी सोने खरेदी करणारा ठराविक वर्ग मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे या मार्केटमध्ये मोठी उलाढाल होते.
इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत गर्दी
एलईडी, एलसीडी, फ्रीज, वॉिशग मशिन, मायक्रो ओव्हन, लॅपटॉप या इलेक्ट्रॉनिकचे शॉप बुकिंगसाठी फुल्ल होत आहेत. शिवाजी स्टेडियम, लक्ष्मीपुरी, गांधीनगर या परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे.
दसरा सणासाठी बाजारपेठ सज्ज
दस-याच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा अनेकांचा कल
Written by अपर्णा देगावकर
आणखी वाचा
First published on: 22-10-2015 at 03:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marker ready for dasara festival