कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीवरून संघर्षांचे फटके उडू लागल्याने महापालिकेने समन्वयाची भूमिका घेतली असून याबाबत सोमवारी एक महत्त्वपूर्ण बठकीचे आयोजन देवल क्लब येथे दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासून कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झाली नव्हती. २४ जुल १९८९ ला ४२ गावांच्या समावेशासह हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव राज्यशासनास सादर केला मात्र विरोधाने तो प्रस्ताव बारगळला. यानतंर तीन वेळा प्रस्ताव पाठवल्यानंतर तीनही वेळा तो प्रस्ताव बारगळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हद्दवाढीसाठी तोंडी आश्वासन दिल्याने २२ जून २०१५ ला पुन्हा २० गावांचा समावेश असलेला प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला. हद्दवाढीबाबतच्या प्रस्तावावर नगरविकास खात्याने जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांचा अभिप्राय मागविला होता. औद्योगिक क्षेत्र वगळून हद्दवाढ करण्याचा अभिप्राय सनी यांनी बुधवारी नगरविकास खात्याकडे पाठविला होता. यानंतर हद्दवाढी विरोधात आंदोलनाने जोर धरला होता. यामुळे हद्दवाढ कृती समितीच्या वतीने पुढील दिशा ठरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बठकीचे आयोजन केले असल्याचे महापालिकेच्या वतीने रविवारी पत्रकाद्वारे सांगण्यात आले.

Story img Loader