कोल्हापूर : देशातील लोकसंख्या, निर्यात बाजारपेठ वाढतच राहणार आहे. वस्त्राची वाढती मागणी लक्षात घेऊन डिकेटीई संस्थेने नवनवीन संशोधन करून अधिकाधिक कापड उत्पादन कसे करता येईल वस्त्रोद्यागाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी सोमवारी केले.वस्त्रोद्योगातील समस्य सोडवून सरकारने प्रोत्साहन देण्याची मागणी वारंवार होत असते. या पार्श्‍वभूमीवर केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग,राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आज कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आले होते. या दरम्यान त्यांनी विविध वस्त्र निर्मिती संस्थांन भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर डिकेटीई महाविद्यालयातील टेक्स्टाईल विभागात पाहणी करून विद्यार्थ्यांशीही संवादही साधला. 

येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सिंग म्हणाले, वस्त्रनगरी इचलकरंजी ही महाराष्ट्राची आण-बाण-शान आहे. कापूस उत्पादन होत नसतानाही येथे दर्जेदार, निर्यातक्षम वस्त्रनिर्मीती केंद्र म्हणुन लौकीक निर्माण झाला आहे. आता एवढ्यावरच न थांबता मूल्यवर्धित वस्त्र उत्पादने तयार करण्याकडे लक्ष द्यावे.बदलत्या काळानुसार इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाने बदल स्विकारत अधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरु ठेवली आहे, हे कौतुकास्पद आहे.जगाची लोकसंख्या सतत वाढत आहे आणि प्रत्येकाला वस्त्राची गरज असते. वस्त्रोद्योग हा कायमस्वरुपी चालणारा उद्योग असल्यानं या उद्योगात नवनवीन संशोधन करून कापड उत्पादन कसे वाढवता येईल, या उद्योगाचा विकास कसा करता येईल याकडे सरकारचे अधिक लक्ष आहे. त्यामुळे डिकेटीईने यावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन त्यांनी केले.

माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी लवकरच दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांचे कापड निर्यात करणारे शहर म्हणून इचलकरंजी नावारुपास येण्यासाठी प्रयत्नशिल आहे. तसेच , ४०० आरपीएम क्षमतेचे आणि परदेशी कंपनीहून अधिक दर्जेदार आणि अत्याधुनिक यंत्रमाग बनवण्यात यश आलंय. त्यांना शासनाकडून यंत्रमाग उत्पादन करण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत प्रोत्साहन मिळणं गरजेचे असल्याचे सांगितलं. येथे कापुस उत्पादन होत नाही मात्र निर्यातक्षम वस्त्रनिर्मीती केंद्र म्हणून नावलौकीक मिळवण्यापर्यंत शहराने मजल मारली आहे.डिकेटीईच संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, डिकेटीईच्या मानद सचिव सपना आवाडे, स्पप्निल आवाडे, रवी आवाडे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले,सुनिल पाटील, डॉ ए.बी. सौंदत्तीकर, एस डी पाटील, अनिल कुडचे, स्वानंद कुलकर्णी, शेखर शहा, कार्यकारी संचालक रवी आवाडे, वैशाली आवाडे, मोसमी आवाडे, डायरेक्टर डॉ एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे. पाटील यांचेबरोबरच वस्त्रोद्योगातील उदयोजक, तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थित होते.