सीमा समन्वयक मंत्री म्हणून सीमाभागातील समस्या समजावून घेऊन या संदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाणार आहे. महाराष्ट्र शासन सीमावासियांच्या पाठीशी राहील, असे मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी शुक्रवारी शिनोळी (ता. चंदगड) येथे आयोजित ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचार सभेत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीमाभागातील जनतेला महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना चालू होत्या. २०२० साली सर्व योजना अचानक बंद करण्यात आल्या. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते ? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.

म्हणून दौरा पुढे ढकलला

बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला.  या योजनासह अन्य सवलती सीमाभागातील जनतेला देण्यासाठी आम्ही सीमाभागात जाणार होतो. त्याला  कर्नाटक सरकारने वेगळं वळण दिले. महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक झाली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा दौरा पुढे ढकलला, असे त्यांनी सांगितले.

सीमावासियांचा आवाज

शंभूराजे देसाई मंचावरून उतरल्यानंतर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. त्यांच्यासमोर शिष्टमंडळाने कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, बेळगाव, कारवार,निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेत अशा घोषणा दिल्या.