लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला मंगळवारी न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेश हिंदुराव कांबळे (वय ५२, रा. कसबा बावडा) असे या आरोपीचे नाव आहे.

आणखी वाचा-कोल्हापुरात शाहूंचे शक्‍तीप्रदर्शन; महाजनसागराच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल

सुरेश कांबळे यांच्या शेजारी पीडित अल्पवयीन मुलगी राहत होती. परिचय असल्यामुळे कांबळे हा पीडीतेच्या स्वयंपाक घरात गेला. त्याने बोलण्याच्या पाहण्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारी अभियोग्यता म्हणून अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीमती एस. एस. पाटील या होत्या.

Story img Loader