कोल्हापूर :  दूधगंगा नदीतील सुळकुड नळ पाणी योजना राबवण्याची भूमिका कायम आहे. तोपर्यंत पंचगंगा आणि कृष्णा या नदीचे पर्याय सक्षम केले जातील. या माध्यमातून एक दिवस आड पाणी इचलकरंजीकराना मिळेल, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी जाहीर सभेत व्यक्त केला. इचलकरंजी पाणी प्रश्नाबाबत आज ताराराणी आघाडीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत आमदार प्रकाश आवाडे यांनी विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> गोकुळ दूध संघाचे चिलिंग सेंटर ‘आंदोलन अंकुश’ने बंद पाडले; शिरोळ तालुक्यातील आंदोलनाने तणाव

गेली काही दिवस कागल तालुक्यातील सुळकुड नळ पाणी योजनेवरून इचलकरंजीकर आणि कागलचे नेते यांच्यामध्ये राजकीय वाद सुरू आहे. याच मुद्द्यावर कागलचे नेते पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रक्ताचे पाट वाहतील असे विधान केले होते. नंतर त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

हा संदर्भ घेऊन आमदार आवाडे म्हणाले , होणारा रक्ताचे पाट वाहायचे असतील तर वाहू द्यात; पण आम्हाला सुळकुड दूधगंगेच्या पाण्याचे पाट वाहायचे आहेत,असे म्हणत त्यांनी सुळकुड योजनेचा निर्धार बोलून दाखवतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला मात्र सुळकुड योजनेला काही अवधी लागणार आहे .तोपर्यंत इचलकरंजीतील पंचगंगा नदीतील पाणी उपसाच्या मोटारी दुरुस्त केल्या जातील .तसेच कृष्णा नळ पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्याचे काम गतीने सुरू आहे. याशिवाय इचलकरंजीत १०० वॉटर एटीएम केंद्रे सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांना गती देईल. इचलकरंजीकराना एक दिवसाला पाणी दिले जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla prakash awade slams minister hasan mushrif over sulkud water scheme in ichalkaranji zws
Show comments