कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित असलेला १००९ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा तातडीने मिळावा, यासह विविध प्रश्न पुणे येथे झालेल्या बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी मांडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा वार्षिक नियोजन सन २०२५-२६ ची राज्यस्तरीय बैठक आज पार पडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास ३०० खाटांची मंजुरी दिली असली, तरी पुरेसा कर्मचारी वर्ग, अत्याधुनिक मशिनरी, एमआरआय मशिन लवकर उपलब्ध करून द्याव्यात. माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त स्मारकाच्या आराखड्यानुसार प्रस्तावित कामासाठी १९९ कोटींचा निधी आगामी अर्थसंकल्पात मंजूर करावा. महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर वाचनालय इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वाचनालय अद्ययावत करावे, अशी मागणीही आवाडे यांनी केली.

Story img Loader