कोल्हापुरात कोरे, महाडिक, घाटगे, यड्रावकर, आवाडे यांचे शक्तिप्रदर्शन; ऋतुराज, सत्यजित, राहुल पाटील यांचा साधेपणाने अर्ज

विधानसभा निवडणुकीची आज जिल्ह्यात धूम उडाली होती. गुरुपुष्यामृत मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल असताना दुसरीकडे शक्तिप्रदर्शनावरही जोर देण्यात आला होता

candidates in Kolhapur file nomination for assembly poll
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. आमदार विनय कोरे, माजी आमदार अमल महाडिक, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी शक्तिप्रदर्शन करतानाच प्रतिस्पर्ध्यांवर टीकास्त्र डागले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे यांनी शक्तिप्रदर्शन केले. आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, राहुल पी. पाटील यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधानसभा निवडणुकीची आज जिल्ह्यात धूम उडाली होती. गुरुपुष्यामृत मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल असताना दुसरीकडे शक्तिप्रदर्शनावरही जोर देण्यात आला होता. यामुळे शहरी भागात वाहतुकीचे नियोजन कोलमडून पडले होते.

Shrikant Pangarkar
Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दोनच दिवसांत हकालपट्टी; कोण आहे श्रीकांत पांगारकर?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Youth murder Amravati, Amravati Crime news,
अमरावती : युवकाची हत्‍या अन् संतप्‍त नागरिकांचा पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्या
Ajit Pawar Jansanman Yatra Amravati,
अजित पवारांची अमरावतीतील जनसन्‍मान यात्रा रद्द
Ajit Pawar On Baba Siddique :
Baba Siddique : “बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना वेदनादायी…”, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया
ratnagiri bjp workers not to work for shiv sena candidates
रत्नागिरी विधानसभेसाठी शिवसेनाच्या उमेदवारांचे काम न करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय, पक्ष बदलण्याचा निर्णय
PM Narendra Modi inaugurated Nangara Vastu Museum at Pohradevi Washim district on Saturday
पंतप्रधान मोदींनी घेतला नगारा वाजवण्याचा आनंद; वाशीमच्या पोहरादेवी येथे…
Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

कोरेंचा घोटाळ्याचा आरोप

शाहूवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी वारणा डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्री हा प्रकल्प विकण्याचा घाट घातला असल्याच्या टीकेला उत्तर दिले. वारणा समूह सक्षम असताना नाहक टीका करण्याचे धैर्य कोणी करू नये. मका प्रकल्पासाठी घेतलेली जमीन पाटील यांनी हडप केल्याचा आरोप कोरे यांनी केला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील गटासोबत असलेले माजी आमदारपुत्र करण गायकवाड हे आमदार विनय कोरे यांच्याकडे गेल्याचा उल्लेख करत त्यांनी कोणी कोणाकडे गेले असले तरी सामान्य जनतेच्या पाठबळावर विजय आपलाच असल्याचा दावा केला.

हेही वाचा >>> शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या अधिसूचनेनंतर महायुती – ‘मविआ’त राजकीय शह – काटशह

काका- पुतणे लक्ष्य

कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास करण्याच्या नावावर मतदारांचा विश्वासघात केल्याची टीका त्यांनी केली. खासदार धनंजय महाडिक यांनी छळ आणि कपट करण्यामध्ये काँग्रेसचे नेते माजी पालकमंत्री तरबेज आहेत असे नमूद करीत सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.

पालकमंत्र्यांवर टीका

कागलमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजितसिंह घाटगे यांनी तसेच त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे या उभयतांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शरद पवार यांच्या आशीर्वादाने मंत्रिपद मिळाले. तरीही त्यांनी जनतेची फसवणूक केली, अशा शब्दात घाटगे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली.

यड्रावकरांचा अपक्ष अर्ज

शिरोळ मतदारसंघात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांच्या मेळाव्याला उपस्थित असलेले खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांनी विकासकामांच्या जोरावर राजेंद्र पाटील यड्रावकर निश्चितपणे विजय मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा >>> शक्तिपीठ महामार्ग रद्द निर्णयाचे कोल्हापुरात स्वागत अन् टीकाही

आवाडे- हाळवणकर एकत्र

इचलकरंजी येथे भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनावर भर दिला. विशेष म्हणजे गेल्या तीन लढतीत आमने सामने असलेले आमदार प्रकाश आवाडे – माजी आमदार सुरेश हाळवणकर हे अर्ज भरण्यासाठी प्रथमच एकत्र आले. मात्र यावेळी हे दोघेही रिंगणात असणार नाहीत. तत्पूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी श्रीफळ वाढवून प्रचार फेरीचा शुभारंभ केला. शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणुकीची तयारी केली होती. याचा संदर्भ घेत खासदार माने यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रवींद्र माने यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द दिला असून त्यांना मानाचे स्थान देण्यात येईल, असे नमूद केले.

मुहूर्ताचा ऋतू

दरम्यान, आज गुरुपुष्यामृत असल्याने हा मुहूर्त साधत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील तसेच करवीरमधील दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला. हे दोघेही आणखी एक अर्ज शक्तिप्रदर्शन करीत दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. ऋतुराज पाटील यांनी ७०० कोटींच्या विकासकामांच्या बळावर पुन्हा जनता विधानसभेत पाठवेल आणि भलते आरोप करणाऱ्यांना घरी बसवले, अशी टीका केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla vinay kore amal mahadik samarjit ghatge file nomination for assembly poll in kolhapur with massive supporters zws

First published on: 24-10-2024 at 23:43 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या