कोल्हापूर : गगनबावडा परिसरात ‘मॉण्टेनचा तस्कर’  या दुर्मीळ सापाचा शोध लागला आहे. गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील यांनी याचा पाठपुरावा केला. दाजीपूर -राधानगरी अभयारण्य हा पश्चिम घाटाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या परिसराची स्वतंत्र अशी परिसंस्था असल्याचे निसर्गतज्ज्ञांनी बऱ्याचदा अधोरेखित केले आहे. डॉ. अमित पाटील यांना या परिसरात आढळणाऱ्या सापांचा शोध‌ घेऊन नोंदी करीत असतात. २ ऑगस्ट रोजी त्यांना ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच दुर्मीळ प्रजातीचा सुमारे ५ फुट लांबीचा तस्कर साप आढळला.

हेही वाचा >>> रघुनाथदादा पाटील यांच्यामुळे भारत राष्ट्र समितीची ताकद वाढणार?

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

उत्सुकता ताणली गेल्यामुळे त्यांनी इंटरनेवरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करूनही काही हाती लागले नाही. त्यांनी राधानगरीच्या सम्राट केरकर यांच्या माध्यमातून जगद्विख्यात सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी व कर्नाटकातील प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विविध फोटोंच्या आधारे निदान करून हा ‘सामान्य तस्कर’ साप नसून ‘मॉण्टेनचा तस्कर’ दुर्मीळ साप असल्याचे कळविले. या मॉण्टेन प्रजातीतही डोक्यावरील व अंगावरील पट्ट्यांनुसार सहा प्रकार असून त्यातील नव्याने आढळलेल्या तिसऱ्या उपप्रकारातील हा साप असल्याचे तज्ज्ञांनी कळविले आहे. डॉ. गिरी यांनी डॉ. अमित पाटील यांच्या सापांच्या अभ्यासाबद्दल कौतुक केले आहे. हा साप अतिशय उजळ रंगाचा असून देखणा असतो. धोक्याची जाणीव होताच तो हल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण पवित्रा घेवून नाग असल्याचे भासवतो. दाट जंगलात वाळवीच्या बिळांमध्ये राहतो उंदीर, सरडे, पाली, लहान पक्षी यांना खाद्य बनवितो.वारंवार त्रास दिल्यास जोरात चावा घेतो;पण तो बिनविषारी साप आहे. गडद तपकिरी रंगाचा असून त्याच्या डोक्यावरील व अंगावरील पट्ट्यांचा वेगळी संगती हा त्याला सामान्य तस्कर सापापासून विलग करतो, असे डॉ. अमित पाटील यांनी गुरुवारी सांगितले. ते स्वर्गीय आर आर पाटील यांचे भाचे आहेत.