लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील परिते गावामध्ये हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित प्रसाद खाल्याने विषबाधा होऊन शंभरहून अधिक लोकांना उलटी,जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना राशिवडे बु, इस्पुर्ली, ठिकपुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Village liquor makers arrested in Wadachiwadi area Pune news
वडाचीवाडी परिसरात गावठी दारू तयार करणारे गजाआड; चार हजार लिटर गावठी दारु, १२ हजार लिटर रयासन जप्त
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
Dog Sterilising Centre vasai virar
वसई : पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र बंद, पालिकेकडून दुरुस्तीचे काम; नवीन निर्बिजीकरण केंद्र ही रखडले
96 Students Hospitalised After Eating Mid-Day Meal
96 Students Hospitalised After Eating Mid-Day Meal : शाळेत खिचडी खाल्ली अन्… चंद्रपूर जिल्ह्यात ९६ विद्यार्थी रुग्णालयात दाखल
Chennai mans scooter-raft ride with grandchildren in flooded complex Viral video
“हे फक्त आजोबाच करू शकतात!” चक्क पुराच्या पाण्यात नातवंडाना बोटीत बसवून फिरवले, Viral Videoपाहून पोट धरून हसाल
bees attack villagers marathi news
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांवर मधमाशांचा हल्ला; अनेक जखमी, ग्रामस्थांची पळापळ…
Amravati murder latest marathi news
पैशांसाठी तगादा लावल्‍याने शीर धडावेगळे केले, हत्‍या प्रकरणाचे गूढ…

हरिनाम सप्ताहामध्ये ५० लोक सहभागी झाले होते. सप्ताहानंतर लोकांना जेवण देण्यात आले होते. त्यामध्ये भात, आमटी, कुर्मा व गुलकंद खीर देण्यात आली होती. जेवण स्थानिक आचाऱ्यांमार्फत घरामध्ये केले होते. दुपारी, प्रसाद घेतल्यानंतर संध्याकाळी त्रास होऊ लागला. हळुहळू रुग्णांची संख्या वाढत गेली. शंभरहून अधिक जणांना पहाटे उलटी, जुलाब व तापाचे या लक्षणाचे रुग्ण आढळून आले.

आणखी वाचा-रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला न मिळाल्यास रस्त्याचे काम सुरू होवू देणार नाही; राजू शेट्टी यांचा इशारा

प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी परिते या गावी भेट दिली असता ७० रुग्णांना उलटी, जुलाब व ताप लक्षणे आढळून आली. त्यांपैकी ३ रुग्ण सीपीआरकडे संदर्भित केले. २२ रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र इस्फुर्ली, ३ रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र राशिवडे व उर्वरित १० रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र राशिवडे येथे संदर्भित केले आहे. ३ रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून सर्व रुग्णांची तब्येत बरी आहे.

शीघ्र प्रतिसाद पथक दाखल

जिल्हास्तरारुन जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाने तात्काळ गावास भेट दिली. पथकामध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी करवीर, कागल व राधानगरी, जिल्हा साथरोगतज्ज्ञ, जिल्हा साथरोग अधिकारी, आरोग्य सहायक व सेवक अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देवून सुचना व मार्गदर्शन केले. एकूण ७० रुग्णांची नोंद झाली असून ३ रुग्ण सीपीआरमध्ये संदर्भित केले असून ४५ रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपचारासाठी वर्ग करण्यात आले आहे.

आणखी वाचा-राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना माराहाण प्रकरण, सतेज पाटील समर्थक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह आठजणांना अटक

प्राथमिक आरोग्य केंद्र इस्फुर्लीमार्फत परिते गावामध्ये आरोग्य विभागामार्फत दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहे. अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेकडे जिल्हास्तरारुन जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाने तात्काळ गावास भेट दिली. अन्नपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले असून ते प्रयोगशाळाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री दिली आहे.

Story img Loader