ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पुरोगामी संघटनांचे कार्यकत्रे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या उपक्रमात सहभागी झाले होते. पानसरे यांच्या विचारांची मशाल तेवत ठेवून वंचितांच्या संघर्षासाठी लढत राहण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला
कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गतवर्षी १६ फेब्रुवारी रोजी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. उपचार सुरू असताना पानसरे यांचा मुंबई येथे २० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. पानसरे यांच्यावरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना संघर्ष समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे. त्याची सुरुवात मंगळवारी सकाळी मॉìनग वॉकने झाली. आयडियल हौसिंग सोसायटीतील पानसरे यांच्या निवासस्थानापासून सुरू झालेल्या वॉकमध्ये एन. डी. पाटील, उमा पानसरे, मेघा पानसरे, दिलीप पवार, उदय नारकर, रघुनाथ कांबळे यांच्यासह विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकत्रे सहभागी झाले होते. ‘कॉ. पानसरे लाल सलाम, आम्ही सारे पानसरे’ अशा घोषणा देत फेरी निघाली. तिची सांगता िबदू चौक येथे झाली. तेथे शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकत्रे सहभागी झाले. पानसरे यांचा लढा पुढे सुरू ठेवण्याची शपथ या वेळी घेण्यात आली.
तपासाबद्दल नाराजी
गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासात गांभीर्य नाही असा आरोप करून एन. डी. पाटील म्हणाले, सरकार सुरुवातीपासूनच तपासाबाबत दचकत पाऊले टाकत आहे. त्यामध्ये धाडसीपणाचा अभाव दिसतो. त्यांच्या कामाची पद्धत पाहता ते क्षमेलासुद्धा पात्र नाहीत. सरकार काय करते यापेक्षा जनता काय करणार आहे हे महत्त्वाचे आहे. पानसरे यांच्या खुनाने कार्यकत्रे खचले नाहीत. तर दुर्दम्य आशावाद ठेवून वाटचाल सुरू आहे.
अल्प प्रतिसाद…एकतेचा अभाव
पानसरे यांचा लढा ताकदीने लढण्याचा निर्धार लाँगमार्चपूर्वी कार्यकत्रे व्यक्त करीत होते. कार्यकर्त्यांमध्ये जोशही दिसत होता. मात्र गेले वर्षभर सातत्याने आंदोलने करूनही आजच्या मॉìनग वॉकवेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. सुमारे शंभरभर कार्यकत्रे यामध्ये सहभागी झाल्याने त्याची चर्चा होती. शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने जमविलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती वगळता एकूण प्रतिसाद अल्प होता. सकाळी कृती समिती व पुरोगामी संघटनेच्या वतीने मॉìनग वॉकचे आयोजन केले होते. तर दुपारी धरणग्रस्तांचे नेते भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली फेरी व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. एकत्रित लढय़ाऐवजी प्रत्येकाने स्वतंत्र झेंडे हाती घेतल्याने त्याचीही चर्चा होती.
पानसरे स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात प्रभात फेरी
वंचितांच्या संघर्षासाठी लढत राहण्याचा निर्धार
Written by लोकसत्ता टीम
First published on: 17-02-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning walk on memorial day of pansare in kolhapur