कोल्हापूर : कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध म्हणून कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी सहभागी होत सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे धरणे आंदोलन करत सीमाप्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरची लढाई कायम राहील,असा निर्धार केला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.