कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कोरोची (ता. हातकणंगले) येथे महिला दिनाचा कार्यक्रम अभूतपूर्व होईल. शासन आपल्या दारी उपक्रम अंतर्गत विविध योजनांचा शुभारंभ,महिला मेळावा , सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याची जय्यत तयारी सुरु आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी खासदार माने,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी शासकीय अधिकार्‍यांसमवेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. त्यांनी अनेक योजनाही जाहीर करून त्याची प्रचिती दिली आहे. आता ते ८ मार्च रोजी हातकणंगले दौर्‍यावर येत असून भव्य मंडप उभारण्यात येत आहे.

हेही वाचा >>> वर्षात दोनवेळा पीक कर्ज घेणाऱ्या कोल्हापुरातील १५ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार

असा असेल दौरा

माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती. त्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या लंडन हाऊसचा लोकार्पण सोहळा, हातकणंगले येथे स्वराज्य भवनाची पायाभरणी, वडगाव येथे नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमीपुजन आणि सराफ असोसिएशनचा रौप्य महोत्सव आदी कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहेत.

इचलकरंजीसाठी घोषणा 

या दौर्‍याच्या निमीत्ताने स्त्री शक्तीचा जागर होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे इचलकरंजीच्या हिताच्या काही योजनाही जाहीर करतील, असा विश्‍वास खासदार माने यांनी व्यक्त केला. 

प्रचाराचा शुभारंभ

दरम्यान, हा कार्यक्रम शासकीय असला तरी यानिमित्ताने जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची एका अर्थाने हि सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp dhairyasheel mane inspected preparation of women s day program in the presence of cm eknath shinde zws