कोल्हापूर : महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ झालेल्या पदफेरीत राजारामपूरी व यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, राजारामपुरी, शाहूपुरी पाठोपाठ कोल्हापूर शहर संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पुढे आले आहे. मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक साधत संजय मंडलिक यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठवूया.’
येथे पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘संजयदादांचा विजय असो’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या पदयात्रेत उमेदवार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजेश क्षिरसागर, भाजपाचे महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सत्यजीत उर्फ नाना कदम, रुपाराणी निकम, विलास वास्कर आदि प्रमुख पदयात्रेत सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय दिसत होता. भाजपा, शिवसेना, आरपीआय आठवले गट, जनसुराज्य व सहकारी पक्षाचे झेंडे घेवून पदयात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा…संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सो पार’ची धडपड – संभाजीराजे छत्रपती
पदयात्रेची सुरुवात राजारापूरी येथील माऊली पुतळ्यापासून करण्यात आली. फटाक्याची आतषबाजी हालगी, घुमक्याच्या निनादात आणि धनुष्यबाणाच्या विजयी करण्याच्या प्रचंड घोषणा देत पदयात्रा हनुमान मंदीर, राजारापूरी ८ वी, ७ वी, व ३ ऱ्या गल्लीतून बागल चौक मार्गे शाहुपूरी ५ गल्ली, नाईक कंपनी, २ – या गल्लीतून महायुतीच्या प्रचार कार्यालयात पदयात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी उमेदवार संजय मंडलिक म्हणाले, ‘जिल्ह्यातून दिवसेंदिवस मिळणारा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे. या विजयासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे नेते आपापल्या पातळ्यावर काम करीत असून सर्वच कार्यकर्त्यांची मोठी ताकद माझ्या मागे उभी आहे. हेच सर्व कार्यकर्ते धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोहचवून मोठ्या मताधिक्याचा विजय मिळवून देतील. असा ठाम विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…वीरेंद्र मंडलिक यांनी वयानुसार बोलावे; सतेज पाटील, संजय पवारांचा पलटवार
पदयात्रेत भाजपाचे शहर अध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील, मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, विकास घागेर, सागर संगोळी, ओंकार चव्हाण, निलेश प्रभावळे, सचिन पवार, रमेश पुरेकर, वंदना बंबलवार, रंजना शिर्के, शेखर मंडलिक, आदिसह भाजपा शिवसेना, जनसुराज्य, आरपीआय आठवले गट आणि महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.