एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी देवेंद्र फडणवीस व आपल्याशी चर्चा केली होती, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज (शनिवार) पत्रकारांशी बोलताना दिली. या निमित्ताने त्यांनी मंडलिक गटाशी गटासोबत पुढील राजकारण होण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या आठवड्यात माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संजय मंडलिक हे आमच्या सोबत राहतील, असे म्हटले होते. त्याला छेद देणारे विधान करतानाच महाडिक यांनी पाटील यांच्यावर टीकाही केली. कोल्हापूर विमानतळावर लाईट लँडिंगला मंजुरी मिळण्यावरून श्रेयवाद रंगला आहे. माजी पालकमंत्र्यांनी विमानतळासाठी पाठपुरावा केला बैठका घेतल्या. माग मंत्री असतानाही त्याला मंजुरी का आणू शकले नाहीत, असा प्रतिप्रश्न महाडिक यांनी केला.
सहकार क्षेत्रातही बदल झाल्याचे दिसतील –
यापुढे विरोधकांनी त्यांचे विकास कामे जाहीर करावे. त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही यातून श्रेयवाद होण्याचा मुद्दाही उपस्थित होणार नाही, असेही महाडिक यांनी यावेळी नमूद केले. सहकार क्षेत्रातही बदल झाल्याचे दिसतील, असा दावाही त्यांनी केला.
आम्ही रणांगणात सज्ज आहोत आणि ते आगामी निवडणुकीत दिसून येईल –
अलीकडे जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये निवडणुकातील पराभवानंतर महाडिक यांना विजयाचा गुलाल लागणार नाही असा समज निर्माण केला गेला. राज्यसभा निवडणुकीनंतर आम्ही रणांगणात सज्ज आहोत आणि ते आगामी निवडणुकीत दिसून येईल, असेही महाडिक म्हणाले.