कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत, मत खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या भेटीत निवडणुक रणनीतीची चर्चा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर मंडलिक व माने यांनी आपआपल्या भागात दौरे वाढवले आहेत. गेले चार दिवस बाहेरगावी असणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आज वारणानगर येथे आले. दोन्ही खासदारांनी कोरे यांची भेट घेतली. उमेदवारीसाठी मदत केल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले.

हेही वाचा >>> “पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

भेटीचे महत्व काय ? 

आमदार विनय कोरे यांचा पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात असल्याने येथे त्यांचा प्रभाव आहे. खेरीज, कोल्हापूर मतदारसंघातील बऱ्याच गावात त्यांना मानणारा वर्ग असल्याने त्यांची मदत उल्लेखनीय ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही खासदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीची रणनीती, प्रचाराची दिशा या अनुषंगाने कोरे यांच्याशी चर्चा केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sanjay mandlik and dhairyasheel mane meet mla vinay kore at warananagar zws