कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केले असल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमधील बैठकीत केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बंडखोरीच्या तयारीत असलेले राजेश लाटकर यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री झालेल्या आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.

शाहू महाराज यांनी राजेश लाटकर यांना ‘मविआ’चा पुरस्कृत उमेदवार म्हणून मान्यता मिळावी असा प्रस्ताव मांडला. त्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी अनुमोदन दिले. सर्वांनी मंजुरी दिली. यावेळी शाहू महाराज म्हणाले, जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागा निवडून आणण्यासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे. राजेश लाटकर यांच्या पाठीशी राहूया.

What Ajit Pawar Said About Sharad Pawar?
Ajit Pawar : “शरद पवारांचं राजकारण मलाच नाही तर महाराष्ट्रात कुणालाच…”, अजित पवार काय म्हणाले?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?

हेही वाचा >>> मधुरिमाराजे छत्रपतींच्या माघारीने काँग्रेसची नाचक्की; पक्षांतर्गत गोंधळ, नेत्यांमधील वादाने पक्ष प्रचारात पिछाडीवर

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत इंडिया – महाविकास आघाडीची ताकद दाखवून देऊया. आमदार जयंत आसगावकर, पक्ष निरीक्षक सुखवंतसिंह ब्रार, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, आर. के. पोवार घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader