कोल्हापूर : विशाळगड येथील दंगलीचा फटका बसलेल्या ग्रामस्थांशी मंगळवारी खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी संवाद साधला.  स्थानिकांनी व्यथा मांडत न्याय देण्याची मागणी केली. किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनावेळी हे हिंसक वळण विशाळगड तसेच पायथ्याशी असलेल्या गजापूर, मुसलमानवाडी या गावांना फटका बसला होता. तेथील घरे, दुकाने, वाहने यांची नासधूस , जाळपोळ, मारहाण करण्यात आली होती.

हेही वाचा >>> विशाळगडावर दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांवर घाव

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

या लोकांशी संवाद साधणार असल्याचे काल इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज दुपारी शाहू महाराज, सतेज पाटील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील माजी आमदार सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती, सत्यजित पाटील सरुडकर, व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, कादर मलबारी, भारती पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी,शंभरहून कार्यकर्ते गेले होते. त्यांना पोलिसांनी रोखले.

हेही वाचा >>> कॉ. गोविंद पानसरे प्रकरणी  डॉ. विरेंद्र तावडे याचा जमीन रद्द; कारागृहात रवानगी

दंगलखोऱ्यांना मोकळे साडले जाते. मदत  करण्यासाठी जाणाऱ्यांना अडवण्याची पद्धत कोणती, अशी विचारणा सतेज पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर  निवडक लोकांना जाण्यास परवानगी दिली. परंतु पत्रकारांना रोखले. पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांनाही वर जाण्याची मुभा देण्यात आली. यावेळी स्थानिक व्यथा मांडताना महिलांनी अक्षरशः टाहो फोडला. पुरुषांच्या डोळ्यांमध्ये अश्रूत तरळले होते. इंडिया आघाडीच्यावतीने दंगलीचा फटका बसलेल्यांना मदत करण्यात आली. दरम्यान आमदार असलम शेख व आमदार अमिन पटेल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण होऊनही दंगलखोरांना कारवाई केली नाही तर त्यांचे नैतिक धैर्य खचेल. विशाळगड हिंसाचार हे राज्यसरकारचे अपयश आहे.दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.