कोल्हापूर : फार फार दूरवर नव्हे तर कोल्हापूर महापालिकेच्या अगदी पिछाडीस खुलेआम अतिक्रमणे वाढू लागतात आणि सुस्त, निष्क्रिय यंत्रणेला याचा पत्ताच नसतो. याबाबत तक्रारीचा मारा सुरू झाल्यावर डोळे उघडलेल्या यंत्रणेकडून कारवाईची पावले कशी पडतात याचे मासलेवाईक उदाहरण दिसून आले. अनधिकृत ७१ टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर महापालिकेच्या नजरेसमोर पानलाइन, बाजारगेट हा भाग. येथे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची रोजचीच वर्दळ असते. दिव्याखाली अंधार प्रमाणे येथे अतिक्रमणे वाढत गेली. चिरिमिरीच्या व्यवहारातून डोळेझाक करण्यात आली. मध्यवर्ती भागातील या अतिक्रमणविरोधात तक्रारी सुरू झाल्या आणि अखेर त्याची दखल घेऊन महापालिकेचा अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. दोन मार्फत दुकानाबाहेर असणाऱ्या अनधिकृत ७१ टपऱ्यांवर काढण्यात आल्या. १ हातगाडी जप्त करण्यात आली.

एक जेसीबी, दोन डंपर व २५ कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली मोहीम संध्याकाळपर्यंत सुरू होती. अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहा.अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, सजन नागलोत, रवींद्र कांबळे, शरद कांबळे आदी कर्मचाऱ्यांमार्फत ही कारवाई करण्यात आली.