कोल्हापूर : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना इचलकरंजी येथे घडली. प्रशांत कांबळे असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अतिश उर्फ टक्क्या, नेटके, आर्यन चव्हाण, बाळू उर्फ प्रदीप यादव यांना ताब्यात घेतले आहे शहापूरमधील सरोजनी नायडू शाळेच्या मागे आज व्यायामासाठी आलेल्या नागरीकांना मृतदेह दिसून आला. त्यांनी शहापूर पोलिसांना माहिती दिली. धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे दिसून आले. तेथे आढळलेल्या मोबाईलवर फोन आल्याने मृतदेहची ओळख पटली. पहाटे प्रशांतच्या आईच्या मोबाईलवर प्रशांत अजुन जिवंत आहे काय ? अशी विचारणा करणारा फोन आला होता. त्याआधारे मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. घोडा गाडी परत मागण्याच्या व आर्थिक देवाण- घेवाणीतून हे कृत्य केल्याची कबुली संशयितांनी दिली. प्रशांत हा गांजाची नशा करत होता.
इचलकरंजीत अल्पवयीन मुलाचा खून; चौघेजण ताब्यात
घोडा गाडी परत मागण्याच्या व आर्थिक देवाण- घेवाणीतून हे कृत्य केल्याची कबुली संशयितांनी दिली
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-07-2024 at 20:12 IST | © The Indian Express (P) Ltd
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder in ichalkaranji murder of minor boy in ichalkaranji zws