कोल्हापूर: आर्थिक कारणातून हातकंणगले तालुक्यात सोमवारी युवकाचा खून करण्यात आला. तर पारगाव येथे जिवलग मित्रांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हातकंणगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये रामचंद्र तुकाराम खिलारे (वय २७, रा. हातकंणगले) याचा आर्थिक वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. पोलिसांनी तपासणी यंत्रणा गतिमान करून संशयित बाळू विनोद जाधव (हातकंणगले) व कपिल बजरंग जाधव (रुई) यांना ताब्यात घेतले आहे.
मित्रांची आत्महत्या
याच तालुक्यात पारगाव येथे तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकादमी जवळ डोंगरात विनायक शिवाजी पाटील ( वय ४० )व बाबासाहेब हिंदुराव मोरे ( वय ४२) यांनी झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. विनायक हा कोकणातून ट्रक द्वारे चिरा आणून विकत होता. तर बाबासाहेब याचे शेत आणि पशुपालनाचा व्यवसाय होता. दोघांवरही कर्जाचा बोजा चढला होता. या नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.