केवळ दहा टक्के पाणी व रासायनिक तसेच सेंद्रिय खताशिवाय भरमसाट विषमुक्त उत्पादन देणारी ‘झिरो बजेट नसíगक शेती’च देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकेल, असे प्रतिपादन नसíगक शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी हुपरी येथे केले.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील किसान विकास मंचच्यावतीने व जवाहर साखर कारखान्याच्या सहकार्यातून ‘झिरो बजेट नसíगक शेती’ या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या हस्ते झाले. समाजकल्याण सभापती किरण कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ प्रमुख उपस्थित होते.
पाळेकर म्हणाले,की पिकांना आवश्यक असणारी नत्र, स्फुरद व पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, निसर्गानेच हवा, पाणी व जमिनीमध्ये नसíगकरीत्या उपलब्ध करून दिली आहेत. कृषी विद्यापीठे पिकांना वरून रासायनिक व सेंद्रिय खतांचा डोस देण्यास शेतकऱ्यांना सांगतात.
ते पूर्णपणे चुकीचे आहे. देशी गायींच्या मलमूत्रात असंख्य कोटी जीवाणू असतात ते जीवाणू हवा, पाणी व जमिनीत असणारी जीवनद्रव्ये शोषून घेतात व पिकांना पुरवितात.
पिकांच्या सभोवताली आच्छादन केल्यास पाणी कमी लागते व जमिनीत गांडुळांची निर्मिती होऊन जमिनीचा कस वाढतो. नसíगक शेतीचा अवलंब केल्यास कमी पाण्यात, कमी खर्चात मुबलक उत्पन्न मिळते. परिणामी, एकाही शेतकऱ्याच्या मनामध्ये कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करण्याचा विचार येणार नाही.
जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, संचालक पुंडलिक वाईंगडे, मानसिंग देसाई, उद्योजक राजेंद्र शेटे, विकास मंचचे अध्यक्ष महावीर शेंडुरे, रवींद्र चौगुले, मोहन खोत, अभिनंदन सौंदत्ते, घनशाम आचार्य उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा