कोल्हापूर महापालिकेतील सत्ता कोंडी अवघ्या एका दिवसात संपुष्टात आली असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या परस्परांविरुध्द लढलेल्या दोन्ही काँग्रेसला नसíगक मित्र असल्याचा साक्षात्कार होऊन उभय काँग्रेसने महापालिकेचे सत्ताशकट एकत्रित हाकण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार सतेज पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ या तिन्ही माजी मंत्र्यांनी हा निर्णय घोषित केल्यावर दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला.
महापालिका निवडणुकीच्या निकालाने कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट कौल दिला नसल्याने सत्ता कोणाची येणार हे अनिश्चित होते. तिसऱ्या स्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे १५ सदस्य असल्याने त्यांचा कौल महत्वाचा होता. हे लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांशी संपर्क साधला. आपण दोघे नसíगक मित्र आहोत, अशी समजूत काढीत दोघांनी सत्तेसाठी परस्परांना आिलगन देण्याचा निर्णय घेतला. त्याची घोषणा मंगळवारी दुपारी सयाजी या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली.
येथे डॉ. कदम, सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये महापालिकेतील सत्ता वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यावर एकमत झाल्यानंतर या त्रयींनी पत्रकारांशी संवाद साधून महापालिकेत दोन्ही काँग्रसने एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर उभय काँग्रेसने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे, असे नमूद करुन डॉ. कदम म्हणाले, दोन्ही काँग्रेस नसíगक मित्र असल्याने विनाअट आघाडी करण्यात आली आहे. सतेज पाटील म्हणाले, पहिल्या एक वर्षांसाठी काँग्रेसकडे महापौरपद व राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमहापौर, स्थायी समिती अशी पदांची वाटणी करण्यात आली आहे. पुढील चार वर्षांचे नियोजन मी व मुश्रीफ एकत्रित बसून करणार आहोत. राष्ट्रवादीचे पक्षनेते शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या संकेतानुसार कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे, असा उल्लेख करुन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने ते कोल्हापूरच्या विकासासाठी निधी देतील असे वाटत नाही. तरीही शासनाशी संघर्ष करुन जनतेच्या मनातील विकासकामे निश्चितपणे पूर्ण करु.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा