कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची २५ ऑगस्ट रोजी येथील ऐतिहासिक दसरा चौक येथे जाहीर सभा होणार आहे. यानिमित्त या गटाचे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरु झाली आहे. या गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर शहर व जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांची नियोजन बैठक पार पडली. व्ही.बी.पाटील यांनी या सभेच्या नियोजन संदर्भातपदाधिका-यांची मते जाणून घेऊन सूचना दिल्या. शुक्रवारी सभेपूर्वी तावडे हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत पवार यांच्या स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष.जयंत पाटील व माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा