राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यामधील कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलताना पाटील यांनी केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल आपण अपशब्द खपवून घेणार नाही असं सांगताना चंद्रकांत पाटलांनी थेट आई-वडिलांनी शिवी दिली तर चालेल पण मोदी-शाहांना शिवी दिलेले सहन करणार नाही अशी आपली ओळख असल्याचं ते दोन नेत्यांमधील संवादाचा दाखला देत म्हणाले होते. मात्र ही गोष्ट सांगताना त्यांनी कोल्हापूरचा उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे चांगलेच संतापले आहे. त्यांनी आपला संताप ट्वीटरवरुन व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’साठी ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने: शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…”

राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या कामांचा दाखला देताना चंद्रकांत पाटलांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. “हातकणंगल्यात रोज उठून आमचे मित्र शेट्टी शिव्या द्यायचे. रोज उठून मोदींना शिव्या द्यायचे. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही चूक करताय. ते अशा भावनेत होते की मला कोण हरवणार. सव्वा लाख मतांनी हारवलं त्यांना,” असं पाटील म्हणाले.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त

नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

पुढे पाटील यांनी शेट्टी आणि भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या भेटीत आपल्याबद्दल चर्चा झाल्याचा दाखला देताना आपल्याला मोदी आणि शाहांबद्दल किती आदर आहे यासंदर्भातील भाष्य केलं. “परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची (राजू शेट्टींची) भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने त्यांनी दादा कोणाला संपवत नाही असं शेट्टींना सांगितलं. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा (चंद्रकांत पाटील) मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही. नशीब पाडला. बाकी काही करायचा त्याचा स्वभाव नाही,” असं त्या मंत्र्याने सांगितल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नक्की वाचा >> ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला प्रकरणातील ११८ निलंबित ST कर्मचाऱ्यांना CM शिंदेंनी पुन्हा सेवेत घेतलं: शरद पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय…”

हा किस्सा सांगताना चंद्रकांत पाटलांनी “आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे,” हे विधान केल्याने अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला आहे. ट्वीटरवरुन आपला संताप व्यक्त करताना मिटकरींनी, “आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. असे नीच वक्तव्य करुन कोल्हापूरच्या मताची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरकरांची व महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी” अशी मागणी केली.

मिटकरींच्या आधी कालच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या विधानावरुन चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

Story img Loader