राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यामधील कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलताना पाटील यांनी केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल आपण अपशब्द खपवून घेणार नाही असं सांगताना चंद्रकांत पाटलांनी थेट आई-वडिलांनी शिवी दिली तर चालेल पण मोदी-शाहांना शिवी दिलेले सहन करणार नाही अशी आपली ओळख असल्याचं ते दोन नेत्यांमधील संवादाचा दाखला देत म्हणाले होते. मात्र ही गोष्ट सांगताना त्यांनी कोल्हापूरचा उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे चांगलेच संतापले आहे. त्यांनी आपला संताप ट्वीटरवरुन व्यक्त केला आहे.
नक्की वाचा >> शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’साठी ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने: शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा