राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी कडून करण्यात येत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी शिरोळ तालुक्यात निदर्शने केली. भाजप हटवा, लोकशाही बचाव,वॉशिंग पॉवडर इडी असे फलक घेऊन घोषणाबाजी केली.
जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’ अशा घोषणा देण्यात आल्या. ‘जवाब दो मोदी सरकार जवाब दो’ असे फलक हाती घेतले होते.
राष्ट्रवादीचे शिरोळचे नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, प्रतिक कुन्नुरे, चंद्रकांत पवार, सतीश भंडारे, पुजारी, अभिनंदन कोळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.