कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत. कोल्हापूर मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष उद्योगपती व्ही. बी. पाटील यांना तर हातकणंगले मधून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्यास जिल्ह्यातील प्रमुखांनी सहमती दर्शवली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मतदार संघाच्या आढावा बैठकीसाठी मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघा बाबतीतचा अहवाल मांडताना जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीस मिळावेत, अशी मागणी केली. उमेदवारीबाबत बोलताना पक्ष संघटना बळकटीसाठी व वाढीसाठी कोल्हापूर मतदार संघासाठी व्ही. बी. पाटील हेच योग्य उमेदवार आहेत, असे सर्वानी सुचवले. त्याच बरोबर हातकणंगले मधून प्रतीक जयंत पाटील यांचे नाव सुचवले.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Jitendra Awhad comment on Ajit Pawar,
साहेब जातात कधी याची वाटच अजित पवार पाहत आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप
maharashtra vidhan sabha election 2024 shahapur assembly constituency sharad pawar ncp vs ajit pawar ncp
अजित पवारांचे दरोडा शिवसैनिकांना नकोसे
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

आणखी वाचा-बनावट नोटा छापून देणारी आंतरराज्य टोळी उजेडात; ठाकरे सेनेचा माजी तालुकाप्रमुख सूत्रधार

सर्वांनी सविस्तर म्हणणे मांडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीस मिळावेत, अशी आपली मागणी रास्त आहे. परंतु दोन्ही पैकी एक मतदार संघ पक्षास मिळेल, असे स्पष्ट केले. त्यापैकी कोल्हापूर मतदारसंघा बाबतीत पक्ष फार सकारात्मक आहे, तो कसा योग्य आहे याची सविस्तर मांडणी केली. त्याकरिता व्ही. बी. पाटील यांच्या उमेदवारीबाबत सर्वांनी आग्रही भूमिका मांडली असल्याने त्यांच्या नावाचा विचार करू, असे आश्वासन दिले. कोल्हापूर मतदार संघ महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीस मिळणे बाबतीत स्वतः शरद पवार हे आग्रही भूमिका मांडतील, असे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी आ.राजेश टोपे, आ.बाळासाहेब पाटील, आ.एकनाथ खडसे, आ. जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशध्यक्ष रोहिणी खडसे, हेमंत टकले, मेहबूब शेख उपस्थित होते. कोल्हापुरातून शहराध्यक्ष आर.के. पोवार, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी माने, महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले, राजीव आवळे, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, शिवाजीराव खोत, नितीन जांभळे, मदन कारंडे, शिवानंद माळी, मुकुंद देसाई इ. उपस्थित होते.