कोल्हापूर :  राज्य शासनाच्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सोमवारी महिला गटात धाराशिव, ठाणे, नागपूर नाशिक, पुरुष गटात पुणे, किशोर गटात यजमान कोल्हापूर,  धाराशिव,  किशोरी गटात सोलापूर, सांगली जिल्हा संघानी विजयी सलामी दिली. स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण ४०4 संघसमावेश असून पुरुष व महिला संघांची अ, ब, क आणि ड या चार गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात 3 आहेत. तर किशोर व किशोरी गटासाठी अ आणि ब असे प्रत्येकी दोन गट करण्यात आले असून प्रत्येक गटात 4चार संघाचा समावेश आहे.

किशोर विभाग :- अ गट : धाराशिव, पुणे, सांगली, नागपूर. ब गट : ठाणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा. किशोरी विभाग :- अ गट : सोलापूर, पुणे, ठाणे, नागपूर. ब गट : धाराशिव, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघातील खेळाडूंची काळजी घेत आमदार राहुल आवाडे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्येक खेळाडूचा 1एक लाख रुपयाचा विमा उतरविला आहे. असा उपक्रम राज्यात प्रथमच इचलकरंजी शहरातील स्पर्धेत राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचे स्पर्धेत सहभागी खेळाडूंमधून कौतुक होत आहे.

इचलकरंजी येथे होत असलेल्या या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण ४० संघांचा समावेश आहे. पुरुष गटात पुणे संघाने नागपूर विरोधातील सामना ८ गुणांनी जिंकला. सांगली – सोलापूर यांच्यातील लढत २६ -२६ गुणसंख्येत बरोबरीत राहिली.

महिलांचे सामने एकतर्फी

महिला विभागात धाराशिवने अमरावतीवर १ डाव ४ गुणांनी दणदणीत मात केली. अकोलाचा ठाणे जिल्ह्याने १ डाव ७ गुणांनी सहजच परभाव केला. पुणे संघाने नागपूरचा १ डाव ९ गुणांनी एकतर्फी पाडाव केला. रत्नागिरीला १ डाव ३ गुणांनी नमवत नाशिकने चुणूक दाखवून दिली.

कोल्हापूर किशोरांचा प्रभाव

किशोर गटात नागपूरने धाराशिवला १ डाव ११ गुणांनी सहजगत्या हरवले. यजमान कोल्हापूरने बुलढाणा संघाला १ डाव १२ गुणांनी जिंकत आपला प्रभाव सलामीलाच सिद्ध केला. किशोरी गटात सोलापूरने नागपूर विरुद्धचा सामना २ गुण व दीड मिनिटे राखून जिंकला. बुलढाणाला सांगलीने १ डाव ४ गुणांनी हरवले.

शानदार उदघाटन

स्पर्धेपूर्वी महात्मा गांधी पुतळ्यापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर स्पर्धा स्तरी आमदार राहुल आवारे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.