कोल्हापूर: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोल्हापुरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर छापेमारी केली आहे. कोल्हापूरसह देशात १४ ठिकाणी छापेमारी केली असल्याचे एनआयएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.छापेमारीत त्यांनी काही डिजिटल डिवाइस, शस्त्रास्त्रे जप्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही इस्लामवादी संघटना आहे. कट्टरपंथीय संघटनेचे दहशतवादी कारवाईशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यावरून देशभरात १४ ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे.त्या अंतर्गत कोल्हापूरमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत एनआयएने अधिक तपशील दिलेला नाही.स्थानिक पातळीवर गुप्ततातर स्थानिक पोलिसांनी याबाबत गुप्तता पाळली आहे.एनआयए सारख्या राष्ट्रीय पातळीवरील तपास यंत्रणा कारवाई करत असताना स्थानिक यंत्रणेला फारशी कल्पना देत नसल्याचे आजवर दिसून आले आहे.तपासाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वर्षात दुसऱ्यांदा छापेमारी
दरम्यान, गतवर्षी जुलै अखेरीस कोल्हापूरमध्ये एनआयएने अशीच एक कारवाई केली होती. एनआयए’च्या पथकाने हुपरी-रेंदाळ दरम्यान असलेल्या अंबाबाईनगर मधील एका घरात छापा टाकला होता. एनआयएने ३० ते ३५ वर्षे वयाच्य इर्शाद शेख आणि अल्ताफ शेख या दोघा भावांना ताब्यात घेतले होते. अंबाबाईनगर येथील एका दुमजली घरातील छाप्यात तपासत काही आक्षेपार्ह आढळले नव्हते. चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले होते.