कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी सात वाजता पंचगंगेसह सात नद्या धोका पातळीवरून वाहत होत्या. त्यामध्ये पंचगंगा, भोगावती, कासारी, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेला संपूर्ण आठवडा पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे धरण, नद्यांची पाणीपातळी सतत वाढत चालली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा दोन दिवसापूर्वी धोका पातळी ४३ फुटाच्या वर वाहत होता. तो आज ४७ फूट इतक्या उंचीवरून वाहत होता. पाणी वाढण्याची गती संथ असली तरी त्यामध्ये वाढ होत आहे.

आणखी वाचा-राधानगरी, काळम्मावाडी धरणातील विसर्ग वाढल्याने कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर

यामुळे एनडीआरएफची आणखी एक तुकडी मागवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे .तर पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळे हलवण्याची मोहीम गतीने सुरू आहे. कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणचे वाहतूक अंतर्गत रित्या बंद करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा शहाजी कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप, कसबा बावडा या मार्गावर जयंती आल्याचे पाणी वाढल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर : राष्ट्रपती रविवारी वारणेच्या दौऱ्यावर; पाऊस झेलत शासकीय यंत्रणा कार्यरत

पाणीपातळी सकाळी सात वाजता (धोका पातळी/आत्ताची पातळी)

पंचगंगा नदी
राजाराम – ५४३ / ५४४ मीटर

भोगावती नदी
बालिंगा – ५४६.30 / ५४६.५०

कासारी नदी
नीटवडे – ५४४.00m / ५४४.९२m

वारणा नदी
शिगाव – ५४६.००m /५४७.५१m

दुधगंगा नदी
कागल हायवे – ५४१.९१m /५३९.३८m

वेदगंगा नदी
बाणगे पूल – ७.५m / ७.२०m

हिरण्यकेशी नदी
भडगाव पूल – ७.५०m/ ७.२०m

घटप्रभा नदी
हिंडगाव बंधारा – ७.०० m / ६.७०m

ताम्रपर्णी नदी
कोवाड बंधारा – ६.५०m / ६.७०m

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine rivers in kolhapur district at danger level mrj