कोल्हापूर : सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनीच घटनेची सर्वाधिक मोडतोड केली. त्यांचीच काँग्रेस आता भाजप संविधान धोक्यात आणत आहे अशी ओरड करत आहे, असे टीकास्त्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी डागले. इचलकरंजी येथे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ते म्हणाले, की घटनेच्या मूलभूत तत्त्वात काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. घटनेत बदल करता येणार नाही, असा उल्लेख केलेला आहे. देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा इंदिरा गांधी यांनी घटनेची मोडतोड करण्याचे काम केले. त्यामुळे पुढे सत्तेवर आलेल्या जनता पक्षाला ते पूर्ववत करण्याचे काम करावे लागले. आता हीच काँग्रेस भाजप संविधान बदलणार असल्याची बिनबुडाची टीका करत आहे. संविधानात मोडतोड करण्याचे काम याच काँग्रेसने केले आहे. हे जनतेने विसरता कामा नये. काँग्रेस लोकांना आपली भूमिका पटवू शकत नसल्याने ते जनमत विचलित करण्याचे काम करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा >>> गौतम अदानी-शरद पवार बैठक, ही वस्तुस्थिती – हसन मुश्रीफ

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी धडाडी, कर्तबगार असलेले राहुल आवाडे यांना विजयी करून विधिमंडळात पाठवावे, असे आवाहन करून गडकरी म्हणाले, की सत्ता मिळाली, की त्याचा वापर विकासकामे करण्यासाठी केला पाहिजे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत ४७ हजार कोटींची रस्तेविकासाची कामे केली. हातकणंगले तालुक्यात ड्रायपोर्ट मंजूर झाले आहे. त्यामुळे मालवाहतूक सुलभ, स्वस्त होण्यासाठी त्याचा लाभ होईल, असा उल्लेख त्यांनी केला. या वेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्ले आदींचे भाषण झाले.