लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराची पालखी किती काळ न्यायची. प्रतीक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना घातले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आजी-माजी खासदारांकडून इचलकरंजीची विकासकामे मार्गी लागली नाहीत. त्यांनी अपेक्षाभंग केला असल्याने आता पक्षाचा, घरचा उमेदवार उभा करावा, अशी मागणी केली. त्यांच्या भावना जाणून आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीचा काय निर्णय होतो ते पाहू, त्या निर्णयासोबत आपणास राहावे लागणार आहे, असे कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष पाटील इचलकरंजी दौऱ्यावर होते. त्यांनी ‘टेक्स्पोजर’ या वस्त्रोद्योग प्रदर्शनासह पंचगंगा नदी तिरावर १०८ कुंडीय गणपती महायज्ञास भेट दिली. त्यानंतर कबनूर येथे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मदन कारंडे, राजीव आवळे, उदयसिंग पाटील, प्रधान माळी आदी उपस्थित होते.